नोकरभरती बंदीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

By Admin | Published: October 20, 2016 01:07 AM2016-10-20T01:07:20+5:302016-10-20T01:38:56+5:30

अहमदनगर : शासकीय पदभरती व इतर भरतींच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार पुकारला़ सरकार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला़

Students of Elgar against recruitment bans | नोकरभरती बंदीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

नोकरभरती बंदीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार


अहमदनगर : शासकीय पदभरती व इतर भरतींच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार पुकारला़ सरकार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला़
जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांची तयारी करणारे हजारो युवक दुपारी वाडीया पार्क येथे जमले़ तेथून हजारोंच्या संख्येने निघालेला स्पर्धा परीक्षार्थींचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला़ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सरकारावर संताप व्यक्त केला़ अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी शासकीय योजनांचा लाभ सर्वसमान्यांना मिळत नाहीत, तर दुसरीकडे सरकारने अघोषित बंदी आणली आहे़ त्यामुळे दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे़ स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन आमचा हक्क आम्हाला देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली़ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला़ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला़ सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन राज्यभर हाती घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़ राज्यभरातून लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात़ पदवीचे शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारतात़ अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न असते़ परंतु, स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रकच जाहीर होत नाही़ वेळापत्रक जाहीर झालेच, तर पदसंख्येत मोठी कपात करण्यात येते़ हा एक प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय असून, विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी महामोर्चा काढला असल्याचे यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्यात, नोकरभरतीतील पदसंख्येची कपात थांबवा, निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी नेमणूक करणे बंद करा, सामान्य अध्ययन विषयाचा निकष राज्यसेवा मुख्य परीक्षेप्रमाणे करा, नोकरीभरतीत पारदर्शकता आणावी, पदभरतीसाठी प्रतीक्ष ायादी तयार करा.
४वाडिया पार्क येथून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला़ विशेष म्हणजे मोर्चाचे नेतृत्व कोणत्या एकाने केले नाही़ हरीश वाघमळे, राहुल माने, हर्षल यादव, राहुल सुरसे आणि अलंकार वाघमोडे या पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिले़

Web Title: Students of Elgar against recruitment bans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.