श्रीगोंदा तालुक्यातील घारगावमधील विद्यार्थी गिरवताहेत धोकादायक शाळेत धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:57 AM2018-01-23T11:57:41+5:302018-01-23T11:58:31+5:30
तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या पावसाळ््यात कोसळल्या. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आजही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यात धडे गिरवावे लागत आहे.
श्रीगोंदा : तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या पावसाळ््यात कोसळल्या. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आजही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यात धडे गिरवावे लागत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) नवीन शाळा खोल्या बांधकामाला मंजुरी मिळण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
पावसाळ्यात घारगाव येथील प्राथमिक शाळेच्या खोल्या मध्यरात्री कोसळल्यामुळे जीवितहानी टळली. त्यानंतर शाळा खोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. यावेळी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतरही शाळेला कोणी एक रूपयांचाही निधी मिळून दिला नाही. मात्र ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून सुमारे चार लाख रुपये खर्च करून काही शाळा खोल्यांची दुरूस्ती केली आहे.