मोदींचा दोन हजारांचा धनादेश शेतक-यांनी केला परत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 04:22 PM2019-10-07T16:22:00+5:302019-10-07T16:52:50+5:30

मोदींचे दोन हजार चालतात. मग मोदींचे कमळ का चालत नाही? असा अजब सवाल खासदार डॉ.सुजय विखे यांनी उपस्थित केला होता. या विधानाचा छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. संघटनेतर्फे सोमवारी विखे यांना दोन हजार रूपयांचा धनादेश त्यांच्या पत्यावर पोस्टाद्वारे पाठविण्यात आला आहे.

Students protest against Sujay Vikhe; Two thousand checks sent | मोदींचा दोन हजारांचा धनादेश शेतक-यांनी केला परत 

मोदींचा दोन हजारांचा धनादेश शेतक-यांनी केला परत 

संगमनेर : मोदींचे दोन हजार चालतात. मग मोदींचे कमळ का चालत नाही? असा अजब सवाल खासदार डॉ.सुजय विखे यांनी उपस्थित केला होता. या विधानाचा छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. संघटनेतर्फे सोमवारी विखे यांना दोन हजार रूपयांचा धनादेश त्यांच्या पत्यावर पोस्टाद्वारे पाठविण्यात आला आहे.
खासदार विखे यांनी दोन दिवसापूर्वी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा उल्लेख करताना  शेतकºयांना दोन हजार रुपये परत करा. नाहीतर कमळाला मत द्या,  असे   वक्त्यव्य केले होते. याचा छात्रभारतीने निषेध केला. आता विखेंनी लोणीमध्ये कमळाला सोडून कोणालाही मत द्यावे, असेही छात्रभारतीने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 
पत्रकावर छात्रभारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष दत्ता ढगे, प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रशांत काकड, संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश जोंधळे, सागर गुंजाळ यांच्या सह्या आहेत.

Web Title: Students protest against Sujay Vikhe; Two thousand checks sent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.