विद्यार्थ्यांनी जिज्ञासू असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:12+5:302021-02-12T04:19:12+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. ९) आयोजित कॉमर्स असोसिएशनचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. ९) आयोजित कॉमर्स असोसिएशनचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य व डॉ. अरुण गायकवाड होते. याप्रसंगी सीए. डॉ. अनंत दिवेकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख प्रा. ललिता मालुसरे, डॉ. हरजीत पंजाबी, कॉमर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वडघुले आदी उपस्थित होते.
आपल्या कल्पनांचा विस्तार करून व त्या सत्यात उतरवून विद्यार्थ्यांनी आपले करिअर उद्योग-व्यवसायात करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू, धाडसी, आत्मविश्वासू असणे गरजेचे आहे. फक्त पुस्तके वाचून कोणतीही व्यक्ती उद्योजक होऊ शकत नाही, त्यासाठी त्याला उद्योजकांसारख्या विचारसरणीचा अवलंब करणे व त्या सत्यात उतरविणेही गरजेचे आहे. जीवनाचा प्रवास सुखकर होण्यासाठी अगोदर काट्यांचा सामना करणे आवश्यक आहे, असेही जाधव म्हणाले. प्रास्ताविक प्रा. ललिता मालुसरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वडघुले यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. हेमलता तारे व प्रा. सारिका पेरणे यांनी केले. डॉ. पंजाबी यांनी आभार मानले.