शाहू महाराजांचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थांना शिकवला जावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:16+5:302021-06-27T04:15:16+5:30
अहमदनगर : राजर्षी शाहू महाराजांनी नगर शहरात येऊन सन १९१४ साली मराठा बोर्डिंगच्या रूपाने शिक्षणाचा पाया घातला. जिल्ह्यातील अग्रगण्य ...
अहमदनगर : राजर्षी शाहू महाराजांनी नगर शहरात येऊन सन १९१४ साली मराठा बोर्डिंगच्या रूपाने शिक्षणाचा पाया घातला. जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्थापनेत त्यांचे योगदान राहिले. २६ जून या त्यांच्या जन्मदिनी राज्यातील प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात त्यांचा प्रेरणादायी इतिहास शिकवला जावा, असे जिल्हा मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी सांगितले.
शनिवारी न्यू आर्टस महाविद्यालयाच्या वाचनालय दालनात कोरोना नियमांचे पालन करत राजर्षी शाहू महाराज यांची १४७वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन नंदकुमार झावरे व संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष रामचंद्र दरे, खजिनदार मुकेश मुळे, विश्वस्त वसंतराव कापरे, न्यू आर्ट्सचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, प्राचार्य अशोक दोडके, प्राचार्य एस. एस. तांबे यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, उपप्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
झावरे म्हणाले, आज देशभर आरक्षणावरून वादंग चालू आहे. शंभर वर्षापूर्वी शाहू महाराजांनी प्रत्येक बहुजन समाजास योग्य आरक्षण दिले असल्याचे दाखले आहेत. महाराजांचे शिक्षणाबरोबरच शेती, व्यवसाय, औद्योगिकरण विकासविषयक विचार विद्यार्थी व समाजापर्यंत पोहचावेत.
जी. डी. खानदेसे म्हणाले, कोल्हापूरचे राधानगरी धरण उभारण्यासह शाहू महाराजांनी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सूत्रसंचालन उपप्राचार्य बाळासाहेब सागडे यांनी केले.
-------------
फोटो - २६जिल्हा मराठा शाहू जयंती
न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या वाचनालय हॉलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी. डी. खानदेशे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, मुकेश मुळे.