वा-याची दिशा बदलण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये हवी - भाऊराव क-हाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 07:22 PM2018-01-25T19:22:39+5:302018-01-25T19:23:13+5:30
शिक्षण घेतानाही गरिबीची पर्वा न करता जिद्दीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने ठरविले तर तो वा-याचीही दिशा बदलू शकतो, असे मत ख्वाडा या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर : शेतक-यांची मुले परिस्थितीमुळे जिद्दी बनलेली असतात. ऊन, वारा, पाऊस त्यांना सशक्त बनवितो. आपण शिक्षण घेतानाही गरिबीची पर्वा न करता जिद्दीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने ठरविले तर तो वा-याचीही दिशा बदलू शकतो, असे मत ख्वाडा या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी व्यक्त केले.
येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांना भाऊराव क-हाडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले़ अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे होते.
भाऊराव क-हाडे यांनी आपला दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास उलगडला़ शेतक-यांच्या मुलांनी आत्महत्या करण्यापेक्षा संकटावर मात करून दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव दीपलक्ष्मी म्हसे, खजिनदार रामचंद्र दरे, अरुणाताई काळे, उपप्राचार्य डॉ. अरुण पंदरकर, प्रा. आर. जी. कोल्हे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी प्राचार्य यु. आर. ठुबे, लॉ कॉलेजचे प्राचार्य एम. एम. तांबे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नवनाथ येठेकर, डॉ. महेबुब सय्यद, डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले़ आभार प्रा. आर. जी. कोल्हे यांनी मानले.