लॉकडाऊन असला तरी विद्यार्थ्यांनी लाॅक होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:21 AM2021-04-01T04:21:14+5:302021-04-01T04:21:14+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि. ३१) श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांना उपयोगी ...
शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि. ३१) श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांना उपयोगी ग्रंथवाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे सदस्य प्रा. संजय नेने, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, आदित्य घाडगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. ढमक यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शरद सावंत यांनी केले. ग्रंथवाटपाचे निवेदन प्रा. मारुती वडीतके व प्रा. रंजना सानप यांनी केले. प्रा. अप्पासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या निमयांचे पालन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी उपस्थित होते.