विद्यार्थी, शिक्षकांचे लसीकरण केल्याशिवाय परीक्षा घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:09+5:302021-05-28T04:16:09+5:30

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा फ्रंटलाइन वर्कर्समध्ये समावेश करून त्यांना लस देण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने होत ...

Students should not take exams without vaccinating teachers | विद्यार्थी, शिक्षकांचे लसीकरण केल्याशिवाय परीक्षा घेऊ नये

विद्यार्थी, शिक्षकांचे लसीकरण केल्याशिवाय परीक्षा घेऊ नये

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा फ्रंटलाइन वर्कर्समध्ये समावेश करून त्यांना लस देण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने होत आहे. परंतु, शासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक शिक्षक, कर्मचारी यांना आपले प्राण गमवावे लागले. प्रत्यक्ष कोविडड्युटी करत असताना १५० हून अधिक शिक्षक व कर्मचारी यांचे बळी गेले. तर, कोविडची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांची संख्या एक हजारांहून जास्त आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग सध्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात लसीकरणाशिवाय परीक्षा घेतल्या, तर आपण लहानग्या विद्यार्थ्यांना कोविडच्या संसर्गात कारण नसताना लोटणार आहोत, असेही कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. या मागणीला शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, सरचिटणीस महेश पाडेकर, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, कोषाध्यक्ष सुनील साबळे, रामराव काळे, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, सचिन जासूद, रूपाली कुरूमकर, कैलास राहणे, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, रोहिदास चव्हाण, बाबासाहेब लोंढे, सुदाम दिघे, हनुमंत रायकर, संभाजी पवार, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, अशोक अन्हाट, संभाजी चौधरी, मोहंमद समी शेख, श्रीकांत गाडगे, सूर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे आदींनी पाठिंबा दिला आहे.

Web Title: Students should not take exams without vaccinating teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.