विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:14+5:302021-01-09T04:17:14+5:30
संगमनेर तालुका पोलीस स्टेशनतर्फे तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे व ...
संगमनेर तालुका पोलीस स्टेशनतर्फे तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जोंधळे होते. प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, एच. आर. दिघे, उपप्राचार्य ज्ञानदेव दिघे, पर्यवेक्षक संजय दिघे, चंद्रभान हापसे, शिवाजी दिघे, बी. सी. दिघे, पुंजाहरी दिघे, पो. हे. कॉ. लक्ष्मण औटी, बाबा खेडकर, भागवत दिघे, बाबा जगताप, तुकाराम सोळसे, भाऊसाहेब दिघे, महेश उगार, प्रभाकर जोरी उपस्थित होते.
पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपणास काय बनायचे आहे? याचे ध्येय निश्चित करून यशासाठी परिश्रम घ्यावेत. नीट, जेईई, यूपीएससी व एमपीएससीची तयारी करावी. विद्यार्थ्यांनी आई- वडील व शिक्षकांपुढे नतमस्तक व्हावे. विद्यार्थीदशेत सैराट चित्रपटातील आर्ची- परशा विचार मनात आणू नयेत. त्याऐवजी यशाचा व करिअरचा विचार करावा. प्रास्ताविक चंद्रभान हापसे यांनी केले. सूत्रसंचालन संजय दिघे यांनी केले, तर बी. सी. दिघे यांनी आभार मानले.
( ०८ पवार)