विद्यार्थ्यांनी हिंदीचे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करून आपले भविष्य घडवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:14+5:302021-09-23T04:23:14+5:30
कोपरगाव शहरातील स्थानिक के. जे. सोमैया व के. बी. रोहमारे महाविद्यालयाच्या हिंदी विभाग व आय. क्यू. ए. सी. विभागाच्या ...
कोपरगाव शहरातील स्थानिक के. जे. सोमैया व के. बी. रोहमारे महाविद्यालयाच्या हिंदी विभाग व आय. क्यू. ए. सी. विभागाच्या विद्यमाने ‘विश्व साहित्य के परिदृश में हिंदी साहित्य का योगदान एवं रोजगार के अवसर’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे होते.
याप्रसंगी विश्व हिंदी महासभेचे संघटन महामंत्री अमित रजक म्हणाले, आमची संस्था हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. हिंदी आणि विविध प्रांतीय भाषांमध्ये समन्वय साधून हिंदीला विश्वभाषा बनविण्यासाठी महासभा प्रयत्नशील आहे. आपले महाविद्यालय ग्रामीण भागातील एक चांगले महाविद्यालय असून हिंदी भाषेत पीएच. डी.पर्यंतच्या संशोधनाची सुविधा असल्याने ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. व्याख्यान सत्राच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे संस्था व महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करताना हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले. आय. क्यू. ए. सी. विभागाचे प्रमुख प्रा. विजय ठाणगे यांनी व्याख्यान सत्राच्या आयोजनाबद्दल हिंदी विभागाचे कौतुक करीत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेतला. हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. बी. दवंगे यांनी केले. प्रा. डॉ. बी. एस. भुजाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. जे. एस. मोरे यांनी आभार मानले.