प्रमोद महाजन परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना मोजावे लागणार पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:23 PM2019-06-02T13:23:49+5:302019-06-02T13:24:05+5:30

भाजपाच्या सत्ता काळात स्व़ प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात मोफत मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थी बाळगून होते़

Students will have to pay the money in Pramod Mahajan Examination Center | प्रमोद महाजन परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना मोजावे लागणार पैसे

प्रमोद महाजन परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना मोजावे लागणार पैसे

अहमदनगर : भाजपाच्या सत्ता काळात स्व़ प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात मोफत मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थी बाळगून होते़ मात्र महापालिकेने स्वत: हे केंद्र चालविण्यास हातवर केले आहेत़ केंद्रासाठी पालिकेने प्रस्ताव मागविले असून, चार विविध सामाजिक संस्थांनी प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यामुळे मोफत मिळणाऱ्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना आता पैसे मोजावे लागणार आहेत़
महापालिकेने स्पर्धा परीक्षा केंद्राची मोफत पुरविली जाणारी सेवा गुंडाळली आहे़ त्याचे खासगीकरण करण्यात येत असून, नवीन इमारतीत केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेने सामाजिक संस्थांकडून प्रस्ताव मागविलेले आहेत़ त्यासाठी विविध चार संस्थांनी प्रस्ताव दाखल केले आहेत़या प्रस्तावांची छाननी महापालिकेकडून करण्यात आली आहे़ या चारही संस्था पात्र ठरल्या आहेत़ नगररचना विभागाने निश्चित केलेली अनामत रक्कम व दरमहा भाडे निश्चित केले जाणार आहे़ त्यानुसार संस्थेशी करार करण्यात येणार आहे़
महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत होती़ या केंद्राने राज्याला अनेक अधिकारी दिले़ त्यामुळे या केंद्राकडे विद्यार्थ्यांना ओढा होता़ पण इमारत कमी पडू लागली़ नवीन इमारत बांधण्यासाठी तत्कालीन नगरसेवक विनित पाऊलबुध्दे व नगरसेवक सचिन पारखी यांनी शासनाकडे पाठपुरवठा केला़
शासनाने नाविन्यपूर्ण योजनेतून स्पर्धा परीक्षा केंंद्राच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला़ महापालिकेच्या सावेडी प्रभाग कार्यालय परिसरात टोलेजंग इमारत उभी राहिली़ पण या इमारतीत केंद्र पुन्हा सुरू करण्यात पालिकेला रस नाही़ त्यामुळे पालिकेने केंद्रच भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे़

पदाधिकाऱ्यांना विसर
महापालिकेत भाजपची सत्ता आहे़ महापौर बाबासाहेब वाकळे भाजपचेच आहेत़ त्यांच्या पक्षाचे नेते स्व़ प्रमोद महाजन यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले केंद्र बंद पडले़ ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविले गेले़ भाडे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ परंतु, पदाधिकाºयांना आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या नावाने सुरू केलेल्या केंद्राचा विसर पडल्याचे दिसते़

Web Title: Students will have to pay the money in Pramod Mahajan Examination Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.