स्वित्झर्लंडची तानिया करतेय गांधी विचारांचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:09 PM2018-10-03T15:09:54+5:302018-10-03T15:10:00+5:30
प्रथमच भारतात आलेल्या स्वित्झर्लंड देशातील २५ वर्षीय युवती तानिया सॉटिनो रिक्सो ही महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान, विचार, संस्कार यांचा अभ्यास करीत आहे.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : प्रथमच भारतात आलेल्या स्वित्झर्लंड देशातील २५ वर्षीय युवती तानिया सॉटिनो रिक्सो ही महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान, विचार, संस्कार यांचा अभ्यास करीत आहे. स्नेहालय ते राळेगण सिध्दी अशा संवेदना जागृती सायकल फेरीचे तिने आंतरराष्ट्रीय सायकलपटू हिरालाल यादव यांच्यासमवेत नेतृत्व केले. भविष्यात भारतातील पर्यावरण समस्येवर काम करण्याचा संकल्प तिने केला आहे.
तानियाचा जन्म इटलीतील सिसीली राज्यात झाला. शालेय शिक्षण इटलीत झाले पण आई वडील स्वित्झर्लंड मध्ये स्थायीक झाले. आई वडीलांना एकुलती एक मुलगी असून तीने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये पदवी संपादन केली आहे. नियमीत व्यायाम व पुस्तके वाचण्याचा छंद असुन सोशल मिडियापासून दूर आहे. रिक्सोे भारतात ९० दिवसासाठी आली असून नगर येथील स्नेहालयातील मुलांबरोबर राहण्याचा आनंद लुटत आहे. स्नेहालय ते श्रीगोंदामार्गे राळेगण सिध्दी ही चार दिवसाची सायकल यात्रा ती करत आहे.
‘मी प्रथमच भारतात आली आहे. मला विविधतेने नटलेल्या भारताविषयी खूप आदर आहे. पण येथील पर्यावरण समस्या खुपच गंभीर आहे. भारत हा पर्यावरण समृध्द देश झाला तर जगातील सर्वोत्तम देश बनू शकतो. भारतातील पर्यावरणावर काम करण्याचा संकल्प असल्याचे तानियानं ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.