सापासोबत स्टंटबाजी, युवकानं गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:00 PM2018-04-11T16:00:13+5:302018-04-11T19:19:52+5:30

सापाबरोबर केलेली स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील युवकाच्या जीवावर बेतली. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने कडकडून दंश केल्याने शिवाजी गेणबा लष्कर (वय २८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सोमवारी(९ एप्रिल) सकाळी घराच्या समोर साप निघाला होता.

Stunts with fellow, youth lost their lives | सापासोबत स्टंटबाजी, युवकानं गमावला जीव

सापासोबत स्टंटबाजी, युवकानं गमावला जीव

ठळक मुद्देकर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील घटना

कर्जत(अहमदनगर): सापाबरोबर केलेली स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील युवकाच्या जीवावर बेतली. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने कडकडून दंश केल्याने शिवाजी गेणबा लष्कर (वय २८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सोमवारी(९ एप्रिल) सकाळी घराच्या समोर साप निघाला होता.
बहिरोबावाडी-चिंचोली फाटा मार्गावरील आडाचे लवन जवळ असलेल्या लष्कर वस्तीवर राहणाऱ्या शिवाजी लष्कर यांच्या घरासमोर साप आढळून आला. तेवढ्यात शिवाजी लष्कर यांनी काठी हातात घेऊन सापाला हाताने पकडण्याची स्टंटबाजी सुरु केली. मोबाईलमध्ये चित्रीकरणही सुरु झाल्याने त्यांची स्टंटबाजी वाढत गेली. सभोवती कुटुंबातील तसेच शेजारील महिला-पुरुषांची गर्दी झाली तसे सापासोबतचे खेळ वाढत गेले. सापाच्या तोंडावर काठीने दाबून दुसºया हाताने तोंडालगत पकडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. सापाकडून हाताला वेटोळे घातले जात होते. ते भयानक दृश्य पाहणाºया महिलांच्या काळजाचे ठोके वाढवित होते. मात्र स्टंटबाजीने झपाटलेल्या युवकाच्या मनात फक्त सापाला तोंडाजवळ पकडण्याची इर्षा होती. साप विष बाहेर टाकतोय हेही तो युवक सर्वांना सांगत होता. तेवढ्यात सापाने त्याच्या हाताला कडाडून चावा घेतला. येथेच चित्रीकरण संपले आणि तीन तासाच्या आतच त्याची जीवनयात्राही संपून गेली.

उपचारापूर्वीच झाला मृत्यू
सापाने दंश केल्यानंतर उपस्थितांनी तत्काळ दवाखान्यात जा असे सूचित केले. तरीही त्याच्यातील स्टंटबाजीचा जोर कायम होता. मला काहीच होणार नाही असे म्हणत त्याने तेथेच वेळ घालवला. काही वेळानंतर विष रक्तात पसरु लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.

आई व पत्नीचेही ऐकले नाही
सापाला पकडत असताना कुटुंबातील महिला आवरण्याचा प्रयत्न करीत होत्या. चावा घेतल्याची घटना घडताच लगेच दवाखान्यात जा, असा सल्लाही दिला आहे. मात्र त्याने कुटुंबीयांचेही ऐकले नाही.

Web Title: Stunts with fellow, youth lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.