रेल्वे पोलिसांना जबर मारहाण : चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 06:17 PM2018-10-27T18:17:58+5:302018-10-27T18:18:15+5:30

रेल्वे स्टेशन आवारातून गर्दी पांगविताना झालेल्या वादातून दोघा रेल्वे पोलिसांना चार जणांनी शिव्यांची लाखोली वाहत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Sub-inspector of Railway Police | रेल्वे पोलिसांना जबर मारहाण : चौघांवर गुन्हा दाखल

रेल्वे पोलिसांना जबर मारहाण : चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : रेल्वे स्टेशन आवारातून गर्दी पांगविताना झालेल्या वादातून दोघा रेल्वे पोलिसांना चार जणांनी शिव्यांची लाखोली वाहत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुक्रवारी (दि.२६) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हाणामारीची ही घटना घडली. याबाबत कोतवाली पोलिसांत शासकीय कामात अडथळा झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दत्ता गायकवाड, अभिजीत गायकवाड, अजित गायकवाड, इसाक मेहबूब (सर्व रा. रेल्वे स्टेशनसमोर, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हेड कॉन्स्टेबल संजय श्रीधर पालवे (वय ३७ , अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाणे, जि.पुणे लोहमार्ग रा. श्रीराम कॉलनी, केडगाव) यांनी फिर्याद दिली. पालवे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल गणेश दहिफळे यांनाही मारहाण करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या गेटवर मारहाण झालेला इसम लोहमार्ग पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी ठाणे अंमलदार ड्यूटीचा चार्ज सहका-यास देत पालवे यांनी पोलीस कॉन्स्टेबल गणेश दहिफळे यांना सोबत घेत रेल्वे स्टेशनच्या गेटवर गेले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून गर्दी पांगवित होते. त्यावेळी हॉटेल दत्ताचे मालक दत्ता गायकवाड याने दोघा पोलिसांना ही तुमची हद्द नसल्याचे सांगत शिवीगाळ केली. त्यानंतर पालवे यांच्या खाकी वदीर्ला पकडून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी अभिजित गायकवाड, अजित गायकवाड, इसाक मेहबूब यांनीही पालवे व दहिफळे यांना मारहाण करत सूर्या हॉटेल व दत्ता हॉटेलच्या बोळीत ओढत नेले. त्यावेळी दत्ता गायकवाड याने या दोघांना खोलीत कोंडा व जीव मारा, असे सांगितले. त्यावेळी दहिफळे याने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. तेथून इतर सहका-यांना आपबिती सांगत पोलीस कुमक घेत घटनास्थळी धाव घेतली आणि पालवे यांची सुटका केली. याबाबत वरील चारही आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळासह भादंवि ३३२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sub-inspector of Railway Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.