छावाच्या आंदोलनाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:12+5:302021-05-31T04:16:12+5:30
श्रीरामपूर : छावा संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव आंदोलनाचा इशारा देताच कारेगाव भेर्डापूर रस्त्याच्या कामातील उर्वरित ...
श्रीरामपूर : छावा संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव आंदोलनाचा इशारा देताच कारेगाव भेर्डापूर रस्त्याच्या कामातील उर्वरित २०० मीटर काम हाती घेण्यात आले.
बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदार यांनी अंदाजपत्रकातील मंजूर एकूण कामात हस्तक्षेप करत हे काम करण्याचे टाळले होते. छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर अभियंत्यांनी तातडीने काम हाती घेतले. मूळ अंदाजपत्रकात हे काम एक हजार मीटर आहे. मात्र ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे काम अवघे ८०० मीटर करण्याचा घाट घातला होता. अंदाजपत्रात हस्तक्षेपही करण्यात आला होता. पटारे यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली. शिवाय हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचेही त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. याशिवाय रस्ता मूळ नकाशाप्रमाणे घेण्यात आलेला नव्हता. मात्र अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा देताच अंदाजपत्रकानुसार काम सुरू झाले.