समता स्कूलचे रोप स्किपिंग स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:57+5:302021-02-13T04:19:57+5:30

१९ वर्षांतील मुली या गटात रूजल रोहमारे हिने एकेरी रोप स्पिड होप या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला, तर ...

Success in Samata School's Rope Skipping Competition | समता स्कूलचे रोप स्किपिंग स्पर्धेत यश

समता स्कूलचे रोप स्किपिंग स्पर्धेत यश

१९ वर्षांतील मुली या गटात रूजल रोहमारे हिने एकेरी रोप स्पिड होप या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला, तर याच गटात आदिती भंडारी हिने फ्री स्टाइल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला. मुलांच्या विभागात याच प्रकारांत अविष्कार पाटील, तर स्पिड स्प्रिंट प्रकारात देवांग भट्टड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. स्पिड स्प्रिंट इंडुरन्स या प्रकारात जतिन दवंगे याने तृतीय क्रमांक पटकवत आपला दबदबा कायम ठेवला आहे. यासह एकंदरीत सांघिक कामगिरीच्या जोरावर स्पिड स्प्रिंट रीले या सांघिक प्रकारात ही द्वितीय क्रमांक पटकावत आपल्या महाविद्यालयाचे नाव राखले आहे. यासह स्पर्धेत सहभागी इतर स्पर्धकांनी ही आपली उत्तम कामगिरी बजावली. विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट शिक्षक उत्सव गांधी व रोहित महाले यांचे मार्गदर्शन लाभले. समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे, शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, विश्वस्त संदीप कोयटे, शाळा व्यवस्थापन समिती शाळेच्या शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन, उपप्राचार्य विलास भागडे यांनी कौतुक केले.

फोटो१२- समता स्कूल- कोपरगाव

Web Title: Success in Samata School's Rope Skipping Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.