एमटीएसमध्ये संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:56+5:302021-07-31T04:21:56+5:30

केडगाव : तालुक्यातील जेऊर येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (एमटीएस) घवघवीत यश मिळविले. विद्यार्थिनी ...

Success of Santuknath English School in MTS | एमटीएसमध्ये संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाचे यश

एमटीएसमध्ये संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाचे यश

केडगाव : तालुक्यातील जेऊर येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (एमटीएस) घवघवीत यश मिळविले.

विद्यार्थिनी तनुश्री बाबासाहेब मगर हिने जिल्हा पारितोषिक, साक्षी उद्धव मोकाटे, प्रेरणा चांगदेव ससे, विवेक गणेश वाघमारे या विद्यार्थ्यांनी तालुका पारितोषिक, वैभव उचित पवार, सिद्धार्थ विठ्ठल दारकुंडे या विद्यार्थ्यांनी विशेष पारितोषिक, तर गायत्री बहिरू वाघ व पूजा रवींद्र तोडमल या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले आहे.

विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख अनिता धनक, विजय चव्हाण, रमेश भांड, प्रेरणा निकाळजे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनी योगिनी आदिनाथ जगदाळे हिची वोडाफोन-आयडिया स्कॉलरशीप २०२१ साठी निवड झाली आहे. या शिष्यवृत्तीचे स्वरूप २० हजार रुपये व प्रमाणपत्र असे आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्व स्कूल कमिटी सदस्य व सल्लागार समिती सदस्य, प्राचार्य सुरेश भिंगारदिवे, उपमुख्याध्यापक प्रकाश वाघमारे, पर्यवेक्षक भानुदास धुमाळ यांनी कौतुक केले.

Web Title: Success of Santuknath English School in MTS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.