विद्यार्थ्यांच्या यशाने ग्रामस्थ भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:25 AM2021-09-17T04:25:25+5:302021-09-17T04:25:25+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील पिंप्री गवळी येथील विद्यार्थ्यांच्या यशाने ग्रामस्थ भारावले असून, त्यांच्यासह पालकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सन्मान सोहळ्याचे ...
सुपा : पारनेर तालुक्यातील पिंप्री गवळी येथील विद्यार्थ्यांच्या यशाने ग्रामस्थ भारावले असून, त्यांच्यासह पालकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सन्मान सोहळ्याचे नुकतेच आयोजन केले होते.
आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून इतरांना त्यापासून प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभिजित भाऊसाहेब थोरात हा शेतकऱ्याचा मुलगा असून, त्याची एसएसबी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सैन्य दलात कमिशण्ड ऑफिसरपदी निवड झाली. गावातीलच शुभम अरुण थोरात या माजी सैनिकाच्या मुलाची नीट परीक्षेच्या माध्यमातून एमबीबीएससाठी निवड झाली. औरंगाबाद येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला आहे. अभिजित थोरात व शुभम थोरात या दोघांनी ग्रामीण भागातही हुशार विद्यार्थ्यांची वानवा नसल्याचे सिद्ध केले. यावेळी सरपंच पंडित थोरात, जिल्हा सहकारी दूध संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र मांडगे, पोलीस निरीक्षक शंकर काळे, एपीआय बळवंत मांडगे, माउली हिरवे, रुई छत्रपतीचे सरपंच बंडू साबळे, सुधाकर थोरात, श्रीराम थोरात, भाऊसाहेब थोरात, योगेश थोरात, बाळासाहेब गुंजाळ, प्रताप काळे, भाऊसाहेब रणसिंग आदी उपस्थित होते. सुरेश थोरात यांनी सूत्रसंचालन केले.
----
१६ पिंपरी गवळी
पिंपरी गवळी येथील विद्यार्थी अभिजित थोरात, शुभम थोरात यांचा सन्मान करताना आमदार नीलेश लंके.