अशोकनगर येथील कोविड सेंटरमध्ये तालुक्यातील ८८ रुग्णांवर यशस्वी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:11+5:302021-05-31T04:16:11+5:30
कोविड सेंटरमध्ये आजअखेर ४८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ व उपाध्यक्ष पोपटराव जाधव यांनी दिली. ...
कोविड सेंटरमध्ये आजअखेर ४८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ व उपाध्यक्ष पोपटराव जाधव यांनी दिली.
प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, माजी आ. भानुदास मुरकुटे आदींच्या उपस्थितीत कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. रुग्णांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा तसेच तपासणी व औषधे विनामूल्य देण्यात येत आहे. कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश उंडे व यांच्या निगराणीखाली उपचार दिले जात आहेत. कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या रुग्णांचा भेर्डापूर येथील प्रगतशील शेतकरी नितीन भाऊसाहेब दांगट यांचे हस्ते पुष्पगुच्छ व वृक्षाचे रोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब दांगट, निपाणी वडगावचे माजी सरपंच आशिष दोंड, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक आप्पासाहेब दुशिंग, डॉ. मंगेश उंडे, नीलेश कुंदे आदी उपस्थित होते. कोविड सेंटरमधून उपचार घेऊन स्वगृही परतणाऱ्या रुग्णांनी वृक्षाचे व्यवस्थित संगोपन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.
-----