सोशल मीडियाचा असाही वापर, शेतकरी गटाने ऑनलाईन विकला सहा लाखांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 07:01 PM2021-05-28T19:01:25+5:302021-05-28T19:02:06+5:30

लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाईन विक्री केली. त्यामून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

With such use of social media, a group of farmers sold six lakh vegetables online | सोशल मीडियाचा असाही वापर, शेतकरी गटाने ऑनलाईन विकला सहा लाखांचा भाजीपाला

सोशल मीडियाचा असाही वापर, शेतकरी गटाने ऑनलाईन विकला सहा लाखांचा भाजीपाला

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाईन विक्री केली. त्यामून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. बाजार समित्यांसह भाजीपाला फळे विक्रीलाही बंदी आहे. नगर तालुक्यातील शेंडी, पोखर्डी, कापूरवाडी, पिंपळगाव उजैनी आदी गावातील शेतकरी भाजीपाला व फळांचे उत्पन्न घेतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने भाजीपाला विकता येत नाही. अशा कठीण परिस्थित पिंपळगाव उजैन येथील बी फार्मर या सेंद्रिय शेतकरी गटाने विक्री व्यावस्थापनाचे धडे घेत सोशल मिडियावरून शहरासह उपनगरातील नागिरकांकडून भाजीपाला फळे, कडधान्य आदींची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार किट तयार करून ते त्यांना पोहोच करण्याचे काम सुरू केले. मागणी वाढत गेल्याने या गटाने आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला व त्याच्या किट बनविल्या. एका किटमध्ये साधारण आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला दिला. जानेवारीपासून ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत ही विक्री सुरू असून, यातून सुमारे सहा लाख रुपयांची उलाढाल झाली. असे या गटाचे सचिव ज्ञानेश्वर वाघ यांनी सांगितले.

दर मंळवारी घरपोहोच भाजीपाला

सोमवार ते शनिवारपर्यंत सोशल मिडीयावर ग्राहकांकडून आर्डर घेण्यात आल्या. आठवडाभरात आलेल्या ऑर्डरची एकत्रित यादी तयार करून ग्राहकाच्या नावाने किट बनविण्यात आल्या. रविवारी ही यादी सोशल मिडीयावर शेतकऱ्यांना पाठविण्यात आली. यादीनुसार शेतकऱ्यांनी आपल्याकडील पालेभाज्या, कलिंगड, खरबूज, चिक्कू शेतकरी गटाकडे जमा केला. एकत्रित जमा झालेल्या भाजीपाला व फळांच्या किट तयार करून त्या ग्राहकांना थेट घरी पोहोच केल्या गेल्या. त्यात काही संस्थांनी मागणी नोंदविली. त्यामुळे मागणी वाढवून शेतकऱ्यांचा भाजीपाला विकला गेला.

परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, कलिंगड , खरबूज खराब होऊ लागले. कमी भावात विक्री करावी लागत होती. त्यात सममित्राचे गणेश सानप यांची भेट झाली. त्यांनी विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच आत्माच्या अधिकाऱ्यांची माहिती दिली. सोशल मिडियावरील अनेक ग्रुप जॉईड झाले. यातूनच मागणी वाढवून चांगले उत्पन्न मिळाले.

- ज्ञानेश्वर वाघ, सचिव, बी फार्मर शेतकरी गट, पिंपळगाव उजैनी

Web Title: With such use of social media, a group of farmers sold six lakh vegetables online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.