साकुरीत भरदुपारी चोरी : घराचे कुलूप तोडून ७२ हजाराचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 06:33 PM2018-09-21T18:33:40+5:302018-09-21T18:33:57+5:30
एक महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्याचे पाहून भरदुपारी चोरट्याने घराचे कुलूप तोडून ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना आज सकाळी साकुरी येथे घडली.
राहाता : एक महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्याचे पाहून भरदुपारी चोरट्याने घराचे कुलूप तोडून ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना आज सकाळी साकुरी येथे घडली.
मदन रामभाऊ गुडे (वय ३०, रा. साकुरी) यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून साकुरीतील इंदिरानगर येथे गुडे भाडोत्री खोलीत पत्नी, दोन मुलांसह राहतात. सकाळी नेहमीप्रमाणे शिर्डी येथे कामावर गेले होते. दुपारी पावणे बाराच्या सुमारास पत्नी घराला कुलूप लाऊन मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेली होती. चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ४९ हजार ५०० रुपये, २३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास शरद गायमुखे करीत आहेत.