राहुरीत विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Published: May 14, 2017 05:05 AM2017-05-14T05:05:54+5:302017-05-14T05:05:54+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बी़टेकच्या विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी (अहमदनगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बी़टेकच्या विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकाने वेळीच त्याला रोखले. मारुती दुधगोंडे याच्याविरुद्ध आत्महत्या केल्याचा गुन्हा
दाखल झाला आहे.विद्यापीठाच्या डॉ़ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालयात २००८ मध्ये मारुतीने प्रवेश घेतला होता़ एका विषयात सतत अनुत्तीर्ण झाल्यानंतर तो २०१२ मध्ये उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने नियमित परीक्षा दिली़ मात्र त्याला वेळेत निकाल मिळाला नाही़ पुढील सत्राचाही तोंडी निकाल देण्यात आला़
विद्यापीठाने खोटे निकालपत्र दिल्याची त्याने कुलसचिवांकडे लेखी तक्रार केली होती.
मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न
केला़ पहिल्या व नंतरच्या निकालपत्रात तफावत आढळून आली़ ३ ते ६ सत्रातील निकालपत्रातही गोंधळ आहे, असे दुधगोंडे याने सांगितले.