साखर कामगार प्रश्नावर एकत्र लढा

By Admin | Published: April 29, 2016 11:20 PM2016-04-29T23:20:33+5:302016-04-29T23:27:01+5:30

श्रीरामपूर :साखर कामगारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.

Sugar workers fight together on the issue | साखर कामगार प्रश्नावर एकत्र लढा

साखर कामगार प्रश्नावर एकत्र लढा

श्रीरामपूर : साखर कामगारांच्या संघटना वेगवेगळ्या असल्या तरी साखर कामगारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूरच्या काँग्रेस भवनात ज्ञानेश्वर व मुळा सहकारी साखर कारखान्यांमध्ये असलेल्या नेवासा तालुका राष्ट्रीय कामगार संघ व मान्यताप्राप्त साखर कामगार संघटनेच्या जनरल कौन्सिलची सभा शुक्रवारी झाली़ या सभेत आदिक यांनी मार्गदर्शन केले़ मावळते अध्यक्ष बबनराव धस अध्यक्षस्थानी होते. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मुळा कारखान्याचे अशोक पवार व सरचिटणीसपदी नितीन पवार यांची निवड करण्यात आली.
दिवंगत गोविंदराव आदिक व बबनराव पवार हे साखर कारखानदारी व साखर कामगारांचे हित जोपासणारे नेतृत्व होते. त्यांचे कार्य व नाव जीवंत ठेवण्यासाठी साखर कामगार चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे. घुले-गडाख यांनी त्यांना जे सहकार्य केले, तेच आताही आम्हाला मिळत आहे, असे सांगून सरचिटणीस पवार यांनी जूनअखेर वेतनवाढीचा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
ज्ञानेश्वर कारखाना संघटना कार्याध्यक्षपदी सुखदेव फुलारी, उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, सचिव जनार्दन कदम, खजिनदार हरिभाऊ नजन, सहसचिव मच्छिंद्र वेताळ, सहखजिनदार संभाजी माळवंदे, कार्यकारी सदस्य अशोक भूमकार, काकासाहेब लबडे, संजय राऊत, अण्णासाहेब गर्जे, मुळा कामगार संघटना कार्याध्यक्षपदी एस. बी. शिंदे, उपाध्यक्ष डी. जी. म्हस्के, सचिव डी. एम. निमसे, खजिनदार एस. ए. दरंदले, कार्यकारी सदस्य इ. जी. कुसळकर, एम. बी. भुसारी, बी. बी. पटारे, जी. एम. पालवे, जी. के. बेल्हेकर यांची निवड करण्यात आली. डी. एम. निमसे यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
महाराष्ट्रात ऊस शेती व साखर कारखान्यांमुळे दुष्काळ पडला, हे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग यांचे विधान शहाणपणाचे नाही. यापुढील वर्ष शेतकरी व कामगारांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
-अविनाश आदिक, श्रीरामपूर.

Web Title: Sugar workers fight together on the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.