साखर कामगार युनियनच्या कुलूपावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:12 PM2017-09-04T15:12:26+5:302017-09-04T15:12:26+5:30
वादाच्या भोव-यात सापडलेले राहुरी फॅक्टरी येथील राष्ट्रीय साखर क ामगार युनियन कार्यालय एक वर्षानंतर सोमवारी नवीन कार्यकारिणीने ताब्यात घेतले़ कार्यालयाच्या कुलूप तोडण्यासाठी तब्बल वीस मिनीटे प्रयत्न करावे लागले़ टॉमी व हतोड्याच्या सहाय्याने पाच कामगारांनी प्रयत्न केल्यानंतर कुलूप निखळून पडले़ नव्या युनियनकडे कारखान्याचा ताबा आला आहे़
ल कमत न्यूज नेटवर्कराहुरी : वादाच्या भोव-यात सापडलेले राहुरी फॅक्टरी येथील राष्ट्रीय साखर क ामगार युनियन कार्यालय एक वर्षानंतर सोमवारी नवीन कार्यकारिणीने ताब्यात घेतले़ कार्यालयाच्या कुलूप तोडण्यासाठी तब्बल वीस मिनीटे प्रयत्न करावे लागले़ टॉमी व हतोड्याच्या सहाय्याने पाच कामगारांनी प्रयत्न केल्यानंतर कुलूप निखळून पडले़ नव्या युनियनकडे कारखान्याचा ताबा आला आहे़कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर व भरत पेरणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर असलेल्या कामगार भवनात आले़ कामगार कार्यालयाचे कुलूप तोडण्यासाठी हतोडा वापरण्यात आला़ त्यात शटरचे एक कुलून तुटले़मात्र दुसरे कुलूप तोडता येईना़ पाच कामगारांनी अथक प्रयत्न केल्यानंतर कुलूप तुटल्याने घामाघूम झालेल्या कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ यावेळी ३० कामगार उपस्थित होते़ कामगारांनी आत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये दोन कपाटे व खुर्च्या आढळून आल्या़ कपाटाला कुलूप असल्याचे आढळून आले़ कामगारांनी साफसफाई के ली़ कामगार युनियनचे माजी अध्यक्ष सुर्यभान गावडे यांच्याकडे कार्यालयाच्या कुलूपाची चावी होती़ वर्षापूर्वी ज्ञानदेव आहेर यांनी कामगार युनियनचे अध्यक्षपद स्वीकारले़ मात्र कार्यालयाची चावी गावडे यांच्याकडे होती़ गावडे यांच्याकडे मागणी करूनही आहेर यांच्या पदारात चावी पडली नाही़ज्ञानदेव आहेर यांनी यासंदर्भात नोटीस देऊन राहुरी पोलीस स्टशनमध्ये तक्रार केली होती़ आज तनपुरे कारखान्याचे रोलर पूजन होते़ कार्यक्रमाचे औचित्य साधून कामगार युनियनचे पदाधिकारी ज्ञानदेव आहेर, भरत पेरणे, बाबासाहेब चव्हाण,जावेद शेख, नामदेव धसाळ, बाळासाहेब ढोकणे,अशोक गाडे, बाळू पवार हे कार्यालयासमोर जमले़ त्यांनी कुलूप तोडून कामगारासमवेत आत प्रवेश केला़