बैलाने मारल्याने काळे कारखाण्याच्या ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

By रोहित टेके | Published: March 14, 2023 06:13 PM2023-03-14T18:13:34+5:302023-03-14T18:13:55+5:30

उस वाहतुकीसाठी असणाऱ्या बैलाने ऊस तोडणी कामगाराला शिंगावर उचलून जमिनीवर टाकल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Sugarcane cutter of black factory killed by bull | बैलाने मारल्याने काळे कारखाण्याच्या ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

बैलाने मारल्याने काळे कारखाण्याच्या ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

कोपरगाव : (जि. अहमदनगर) उस वाहतुकीसाठी असणाऱ्या बैलाने ऊस तोडणी कामगाराला शिंगावर उचलून जमिनीवर टाकल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव- कोळपेवाडी हद्दीतील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना बैलगाडी यार्डात सोमवारी (दि.१३) रात्री आठवाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दामू रंभा सपनार ( वय ५८, रा. नीरगाव ता. सिन्नर जि. नाशिक ) असे मृत उसतोडणी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दामू सपनार सोमवारी सायंकाळी यार्डात असताना त्यांच्यावर अचानक बैलाने हल्ला करत त्यांना शिंगावर उचलून घेत जमिनीवर टाकले. त्यात त्याच्या डोक्याला मागच्या बाजूने गंभीर दुखापत झाली. त्यांना जखमी अवस्थेत स्थानिक डाँ. दत्तात्रय कोळपे यांच्या क्लिनिक येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांनंतर कोळपेवाडी ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेतुन पुढील उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनंतर काही वेळाने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मयत घोषित केले. हंगाम अवघा काही दिवसावर येवून ठेपला असतांना सपनार यांच्या दुर्दैवी मृत्यूने ऊसतोडणी कामगार व ग्रांमस्थामध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक राजू चव्हाण करीत आहे. 

Web Title: Sugarcane cutter of black factory killed by bull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.