पावसाळ्यातील निवा-यासाठी ‘सुगरणी’ची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:16 PM2019-09-15T12:16:43+5:302019-09-15T12:17:56+5:30

कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी परिसरातील एका विहिरीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाला मनमोहक विणकाम केलेले घरटे तयार करताना सुगरण पक्षी परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

'Sugary' bag for rain showers | पावसाळ्यातील निवा-यासाठी ‘सुगरणी’ची लगबग

पावसाळ्यातील निवा-यासाठी ‘सुगरणी’ची लगबग

काकासाहेब खर्डे/  
धामोरी : धरतीने हिरवा शालू परिधान करताच सुगरण पक्षांनाही विणीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी परिसरातील एका विहिरीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाला मनमोहक विणकाम केलेले घरटे तयार करताना सुगरण पक्षी परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पावसाळ्यातील दिवस हे सुगरण पक्षांचा घरटे विणीचा हंगाम असतो. साधारण आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये हा पक्षी अंडी घालतो. त्यामुळे ती अंडी घालण्यासाठी सुगरण पक्षी वैशिष्ट्यपूर्ण असे एक घर बांधतो. एकेक काडी गोळा करून त्याची सुबक अशी रचना करताना तिच्याही नाकी नऊ येतेच. सुगरण पक्षांना ग्रामीण भागात रानचिमणी किंवा पिवळी चिमणी म्हणतात. नर सुगरणीचा रंग पिवळा असतो. तर मादी करड्या रंगाची असते. सुगरणी घरटे झाडावर उलट्या दिशेने तयार करतात. तर नर सुगरण मादीला आकर्षित करण्यासाठी एकाच झाडावर दोन - तीन घरटे तयार करतो. जे घरटे मादीला पसंद पडते ते ती स्वीकारते व त्यात त्यांचा संसार सुरू होतो. बाकीचे घरटे मग तशीच अर्धवट राहतात.

बोर, काटेरी बाभूळ आदी प्रकारच्या काटेरी झाडांना अडचण समजून त्यांना तोडू नयेत. घरटे बांधण्यासाठी जास्तीत जास्त अशाच काटेरी झाडांची पक्षी निवड करतात. त्यामुळे वृृक्षारोपण करताना देखील या प्रकारची झाडेही योग्य जागेची निवड करून लावण्याची गरज आहे, असे पक्षीमित्र सतीश साबळे यांनी सांगितले. 

Web Title: 'Sugary' bag for rain showers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.