सुहासभाई मुळे यांचा जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 02:22 PM2018-04-22T14:22:37+5:302018-04-22T14:22:45+5:30

अहमदनगर : महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते सुहासभाई मुळे यांना एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जास्त हुशारी दाखविली तर तुमच्यावर आम्हीच प्रशासक नेमू आणि त्या प्रशासकाचे नाव असेल ‘यमराज’ असा मजकूर असलेली चिट्ठी त्यांना मिळाली आहे. 

Suhas Bhai threatens to kill them | सुहासभाई मुळे यांचा जीवे मारण्याची धमकी

सुहासभाई मुळे यांचा जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर : महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते सुहासभाई मुळे यांना एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जास्त हुशारी दाखविली तर तुमच्यावर आम्हीच प्रशासक नेमू आणि त्या प्रशासकाचे नाव असेल ‘यमराज’ असा मजकूर असलेली चिट्ठी त्यांना मिळाली आहे. 
सुहासभाई मुळे यांनी जागरुक नागरीक मंच स्थापन केला आहे. या मंचाद्वारे ते शहरातील समस्यांबाबत नेहमीच जागर करतात. तसेच आंदोलनेही करतात. शहरातील समस्यांवर उपाय सूचविणारे ते उपक्रमही आयोजित करतात. मुळे यांनी महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. या अनुषंगाने त्यांना धमकी देण्यात आली आहे.
 तुमची बुद्धी आणि हिम्मत इथे जास्त वापरू नका. असा एकदाच सल्ला आहे. महापालिकेवर जर प्रशासक नेमून आमच्या मागे लागले तर  आम्ही पण तुमच्यावर प्रशासक नेमू आणि त्याचे नाव असेल यमराज, असा मजकूर असलेली चिट्ठी मुळे यांना पाठविण्यात आली आहे. मुळे यांना ही चिट्ठी त्यांच्या घरासमोरील लेटर बॉस्कमध्ये मिळाली आहे. याबाबत मुळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 हा कोणीतरी खोडसाळपणा केला असण्याची शक्यता आहे. मात्र त्याला न घाबरता आपला लढा सुरूच राहील, असे मुळे यांनी सांगितले. महापालिकेवर प्रशासक नियुक्ती करण्याची मागणी ही पक्षातीत असून जागरुक नागरिक मंच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे मुळे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Suhas Bhai threatens to kill them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.