सुपा परिसरात परप्रांतीय कामगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:32 AM2020-05-11T11:32:56+5:302020-05-11T11:33:38+5:30
पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथे एक ओडिसा येथील परप्रांतीय कामगाराने शनिवारी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. विनायक कन्हार (रा. भुटकल नाली, कंधमाल बधाभुईन, ओडिसा), असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.
सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथे एक ओडिसा येथील परप्रांतीय कामगाराने शनिवारी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. विनायक कन्हार (रा. भुटकल नाली, कंधमाल बधाभुईन, ओडिसा), असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. राहुल बबन गाडीलकर यांनी फोनवरून याबाबत सुपा पोलीस ठाण्यात खबर दिली. सुप्यातील सुरज बिल्डकॉन कंपनी येथील कामगार विनायक कन्हार वाघुंडे गावातील कंपनीचे कामगार राहत असलेल्या चाळीतील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुरज बिल्डकॉन ही बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचे विस्तारित सुपा एमआयडीसीत सध्या काम सुरू आहे. कामगाराच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.