घोडेगावच्या दंतज्ज्ञाची पुण्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 04:06 PM2017-06-07T16:06:15+5:302017-06-07T16:06:15+5:30
तालुक्यातील घोडेगाव येथील डॉ. अभिजित मारुती मचे ( वय ३६) यांनी वाघोली येथे फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.
आॅनलाईन लोकमत
श्रीगोंदा, दि़७ - तालुक्यातील घोडेगाव येथील डॉ. अभिजित मारुती मचे ( वय ३६) यांनी वाघोली येथे फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.
मचे निवृत्त कृषी अधिकारी मारुती पाराजी मचे यांचे ज्येष्ठ चिरंजीव व श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक श्रीमल मचे यांचे पुतणे होत. डेन्टिस्टचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी सुरुवातीला चंदननगर येथे दाताचा दवाखाना सुरु केला. त्यानंतर त्यांनी वाघोली येथे फ्लॅट घेऊन दवाखाना भीमा- कोरेगाव येथे स्थलांतरित केला. गेल्या दहा वर्षापासून ते दातांचा दवाखाना चालवित होते.
डॉ. मचे यांच्यामागे वडील, पत्नी, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे. घोडेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मचे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. लोणीकंद पोलीस ठाण्यात याबाबत आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.