एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या : अकोले तालुक्यातील चास गावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:05 AM2018-10-23T11:05:58+5:302018-10-23T11:06:03+5:30

तालुक्यातील चास गावामध्ये एका तरुण शेतक-याने आपली पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीसह आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Suicide of three from a single family: Incident of Chas village in Akole taluka | एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या : अकोले तालुक्यातील चास गावातील घटना

एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या : अकोले तालुक्यातील चास गावातील घटना

अकोले : तालुक्यातील चास गावामध्ये एका तरुण शेतक-याने आपली पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीसह आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या हृदय पिळवटून टाकणा-या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
पांडुरंग राधू शेळके (३१ वर्षे) हे आपली पत्नी सोनाली(२१ वर्षे) व मुलगी शिवन्या या आपल्या २ वर्षाच्या चिमुकलीसह चास गावातील गाढवी शिवारामध्ये अनेक वषार्पासून रहात होते. त्याठिकाणी एक हेक्टर शेती त्यांच्याकडे होती.मजुरी करूनही ते आपली शेती व्यवस्थित सांभाळत होते. तीन वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील सोनालीशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना शिवन्या नावाची दोन वर्षे वयाची एक मुलगीही होती.
सोमवार (दि.२२ आॅक्टोबर) रोजी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास किशोर कारभारी शेळके हा शेजारी राहणारा तरुण आपल्या मित्राकडे सहज आला. यावेळी गायीचे दूध काढलेले नसल्याने पांडुरंगला पाहण्यासाठी दरवाजा बंद असल्याने खिडकीतून डोकावले. यावेळी घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने लगेच आपल्या इतर मित्रांना फोन करून बोलावले. पोलीस पाटील संदीप वाडेकर यांनी अकोले पोलीस स्टेशनला खबर दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पो.हे.कॉ. जब्बीर सय्यद, पो.हे.कॉ. ए. पी.निपसे, पो.हे.कॉ. संतोष वाघ, पो.ना.संदीप पांडे घटनास्थळी पोहचले. बंद घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी स्थानिक पंचांच्या मदतीने घरामध्ये प्रवेश केला असता पांडुरंग आपली पत्नी सोनाली व मुलगी शिवन्या यांच्यासह घरामध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत.
घडलेल्या घटनेची वेळ निश्चितपणे सांगता येत नाही.परंतु या घटनेला अंदाजे २४ तास उलटून गेले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. अकोले पोलिसांनी झालेल्या घटनेची सी.आर.पी.सी. १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Suicide of three from a single family: Incident of Chas village in Akole taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.