जवळ्यात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:00+5:302021-04-13T04:20:00+5:30
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस ...
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला.
मनोज रंगनाथ सालके (२६, रा. जवळे, ता. पारनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मनोज सालके हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे जनावरांसाठी घास आणण्यासाठी शेतात गेला होता. त्यानंतर शिरूर-जवळे-निघोज रस्त्यालगत असणाऱ्या आंब्याच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या नऊ वाजता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ही माहिती मनोजच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, निघोज पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल विलास लोणारे, मयूर तोरडमल यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
--
१२ मनोज सालके