पीक हवामान प्रतिमाने उपयुक्त प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:20 AM2020-12-31T04:20:50+5:302020-12-31T04:20:50+5:30
जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान ...
जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषिविज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत पीक हवामान प्रतिमाने, हवामान अद्ययावत शेतीची साधने या विषयावर २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत एक आठवड्याचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी के. के. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन व्हिएन्ना आंतरराष्ट्रीय केंद्र, ऑस्ट्रीया येथील बाह्य अंतराळ प्रकरण संयुक्त राष्ट्र संघ कार्यालय, यूएन स्पायडर प्रोग्राम, बीजींग कार्यालयाचे प्रमुख शिरीष रावण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख, प्रमुख संशोधक सुनील गोरंटीवार, सहसमन्वयक मुकुंद शिंदे, रवी आंधळे, जयवंत जाधव उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु डॉ. अशोक ढवण म्हणाले की, हवामान अद्ययावत शेतीसाठी पीक हवामान प्रतिमाने मोलाची भूमिका बजावत असून पीक उत्पादनवाढीसाठी त्याचा कार्यक्षम उपयोग कसा व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करणे जास्त गरजेचे आहे. पीक हवामान प्रतिमाने या विषयावर संशोधन व विस्तार करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कटिबद्ध आहे.