संडे स्पेशल मुलाखत : राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा धूळ चारू : भानुदास बेरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:12 PM2019-04-21T12:12:16+5:302019-04-21T12:15:09+5:30

गत लोकसभा निवडणुकीत देशाने मोदी लाट पाहिली आहे. यावेळेस तर ही लाट अधिक तीव्र आहे.

Sunday Special Interview: Once again, the Nationalist Congress Party will dust: Bhanudas Berad | संडे स्पेशल मुलाखत : राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा धूळ चारू : भानुदास बेरड

संडे स्पेशल मुलाखत : राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा धूळ चारू : भानुदास बेरड

अहमदनगर : गत लोकसभा निवडणुकीत देशाने मोदी लाट पाहिली आहे. यावेळेस तर ही लाट अधिक तीव्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला याही निवडणुकीत आम्ही धुळ चारु, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे गेलात?
मोदी व फडणवीस सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबविल्या. राष्टÑीय महामार्ग, जलसिंचन, जलयुक्त शिवार, आरोग्य, शेती या क्षेत्रात भरीव कामे झाले. राष्टÑीय सुरक्षिततेच्या मुद्यावर मोदी सरकारने ठाम भूमिका घेतली. हे सर्व मुद्दे आम्ही प्रचारात जनतसमोर मांडले आहेत. मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान हवेत हा आमचा प्रमुख मुद्दा होता.

तुमची प्रचाराची पद्धत काय होती?
आम्ही सुरुवातीला कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा घेतला. नंतर तालुका मेळावे घेतले. त्यानंतर गावोगावी प्रचारासाठी पोहोचलो. घरोघर आम्ही संदेश पोहोचविला.

जिल्ह्यातील काय मुद्दे प्रचारात होते?
प्रलंबित जलसिंचन योजनांबाबत आम्ही बोललो. तुकाई, साकळाई या योजनांना प्राधान्य देण्याचे आम्ही सांगितले आहे. शिर्डीत आम्ही निळवंडे कालव्यांचा प्रश्न मांडत आहोत.

शिवसेनेची साथ कशी आहे?
आमची युती ही मनापासून आहे. नगरला सेना व शिर्डीत आम्ही त्यांच्या प्रचारात पूर्णत: सक्रीय आहोत. नगरला आमदार अनिल राठोड, विजय औटी यांनी खूप मेहनत घेतली आहे. शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे.

तुम्ही उमेदवार आयात केल्याचा आरोप झाला.
तसे काही नाही. राजकारणात अशी बेरीज करावी लागते. तो पक्षीय निर्णय आहे. सर्व कार्यकर्ते ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे आहेत.

दिलीप गांधींसह सर्वजण सक्रीय
विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज नाहीत. ते प्रचारात सक्रीय आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी उत्तम काम केले. भाजपमध्ये प्रत्येक जण राष्टÑहित व पक्षाला महत्त्व देतो. सर्व भाजप एकसंध आहे. भाजप, सेना व विखेंची यंत्रणा अशी सर्व ताकद एकत्र झाली आहे. विखे यांना मोठा राजकीय वारसा असल्याने भाजपची ताकद वाढली. मी अध्यक्ष झाल्यापासून सर्व निवडणुका जिंकत आलो आहे. पालकमंत्री, आमचे सर्व आमदार यांनी मोठी विकासकामे केली आहेत. भूजलपातळीबाबत तर जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला. त्यामुळे विजय आमचाच आहे याची खात्री आहे.

मोदी लाट तर आहेच. सुजय विखे यांचे शिक्षण व त्यांची प्रतिमा हीही आमची बलस्थाने आहेत. त्यामुळे नगरला पुन्हा भाजपचाच खासदार होणार. भाजपचा कार्यकर्ता हा बुथपर्यंत सक्रीय असतो. निवडणुकीपूर्वीच आपण जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व तयारी केली होती. सुजय विखे यांनीही प्रचारात खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे नगरच्या यशाबाबत आम्हाला चिंता नाही. मोठ्या फरकाने आम्ही जिंकू. - भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष

 

Web Title: Sunday Special Interview: Once again, the Nationalist Congress Party will dust: Bhanudas Berad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.