सासऱ्यानेच केला सुनेवर अत्याचार, सासरा फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:52 PM2021-02-27T16:52:34+5:302021-02-27T16:53:35+5:30

सासऱ्याने आपल्या सुनेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करून सासरा - सुनेच्या नात्याला काळीमा फसल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडला.

Sune was tortured by his father-in-law, father-in-law absconded | सासऱ्यानेच केला सुनेवर अत्याचार, सासरा फरार

सासऱ्यानेच केला सुनेवर अत्याचार, सासरा फरार

कोपरगाव : सासऱ्याने आपल्या सुनेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करून सासरा - सुनेच्या नात्याला काळीमा फसल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडला.

    याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सासऱ्यासह पतीच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२६ ) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सासरा फरार आहे.

२१ वर्षीय महिलेचे कोपरगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाशी मे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तीन महिने सासू, सासरे व सासू हे सुनेशी चांगले वागत होते. मात्र, काही दिवसांनी सासऱ्याची वाईट नजर पडली. त्यानंतर सून अंघोळ करताना डोकावणे, चहा दिल्यानंतर तिचा हात पकडणे अशा गोष्टी सासरा करू लागला. ऑगस्ट २०१८ मध्ये एके दिवशी दुपारी १ वाजेच्या सुमारास सून घरात एकटीच असल्याचे पाहून सासऱ्याने तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारून टाकीन, अशी धमकी दिली.

    सुनेने त्याच रात्री आपल्या पतीला व सासूला घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्या दोघांनीही सुनेचे काहीच ऐकले नाही. त्यानंतर सासऱ्याने त्याच महिन्यात पुन्हा सून घरात एकटी असताना तिच्यावर दोनदा अत्याचार केला. ही बाब पिडीत महिलेने तिच्या पतीला सांगितले. तुला नांदायचेच नाही, त्यामुळे तू माझ्या वडिलावर असे आरोप करते, असे पती म्हणाला. त्यामुळे पिडीतेने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना देखील सांगितला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये तुला कायमची माहेरी सोडून देतो असे सांगत पतीने माहेरी सोडले.

Web Title: Sune was tortured by his father-in-law, father-in-law absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.