मांडवेचे सुनील वांढेकर एमएमआरडीएचे अभियांत्रिकी प्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:05+5:302021-03-27T04:22:05+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावचे भूमिपुत्र सुनील अण्णासाहेब वांढेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिवपदी पदोन्नती झाली आहे. मुंबई ...
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावचे भूमिपुत्र सुनील अण्णासाहेब वांढेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिवपदी पदोन्नती झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियांत्रिकी प्रमुखपदी त्यांची गुरुवारी निवड झाली. वांढेकर सध्या मंत्रालयातील आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम व्यवस्थापन कक्षात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वांढेकर यांनी १९८६ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथून बी.ई. सिव्हिल विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. त्यानंतर मुंबईतील व्हिजेटीआयमधून एमई सिव्हिल विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता वर्ग एक पदासाठी निवड झाली. याद्वारे १९८९ मध्ये शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर वांढेकर यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता वर्ग १, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता या पदावर त्यांनी काम केले आहे. त्यांनी श्रीगोंदा, बीड, आंबेजोगाई, पुणे, नांदेड, औरंगाबाद, ठाणे, मुंबई आदी ठिकाणी विविध पदांवर काम केले.
--
२६सुनील वांढेकर