भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनीता खेडकर मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:53 PM2019-12-31T12:53:40+5:302019-12-31T12:53:46+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपही मैदानात उतरले आहे. भाजपच्या सुनीता खेडकर यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बिनविरोध होणारी अध्यक्षपदासाठी आता निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार, हे तीन वाजताच कळणार आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपही मैदानात उतरले आहे. भाजपच्या सुनीता खेडकर यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बिनविरोध होणारी अध्यक्षपदासाठी आता निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार, हे तीन वाजताच कळणार आहे.
काँग्रेसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. राज्यातील पॅटर्नप्रमाणे महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादीचा अध्यक्ष व काँग्रेसचा उपाध्यक्ष यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अध्यक्षपदासाठी राजश्री घुले यांनी अर्ज दाखल केल्यानंतर उपाध्यक्षपदासाठी प्रताप शेळके यांचा अर्ज दाखल झाला आहे,
भाजपकडूनही अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात हालचाली सुरू आहेत. जालिंदर वाकचौरे यांनी भाजपसाठी दोन अर्ज नेले होते. ऐनवेळी भाजपकडून उमेदवार मैदानात उतरला आहे.