अण्णांच्या समर्थनार्थ जामखेड येथून कार्यकर्ते दिल्लीला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 09:54 PM2018-03-21T21:54:28+5:302018-03-21T21:55:16+5:30
जामखेड : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथून २५ जणांचा गट बुधवारी ...
जामखेड : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथून २५ जणांचा गट बुधवारी रवाना झाला.
या सत्याग्रह आंदोलनासाठी येथील समाजसेवक संतोष पवार, प्रा. मधुकर राळेभात, गुलाब जांभळे व सिध्दार्थ घायतडक यांनी पुढाकार घेतला. संतोष पवार म्हणाले, अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. परंतु चार वर्षे होत आली तरी मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. अण्णांच्या पाठिंब्यासाठी स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते जमा झाले आहेत. दि. २३ रोजी आम्ही सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देऊ व मागण्या मान्य होईपर्यंत तेथून उठणार नाही, असा निर्धार त्यांनी केला.