नगरमध्ये भाजपाचा पाठिंबा कोणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 06:57 AM2018-12-17T06:57:11+5:302018-12-17T06:57:51+5:30
महापौर निवडणूक : सेना-भाजपा युतीबाबत तळ््यात-मळ््यात
अहमदनगर : कोणत्याही परिस्थितीत महापौर हा शिवसेनेचाच होणार, हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर भाजपाने मात्र युतीबाबत मौन बाळगले आहे. नेमके कोणासोबत जायचे? याचा अद्याप निर्णय
झाला नसल्याचे भाजपा नेते सांगत आहेत. वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवरही कोणतीही बोलणी न झाल्याने महापालिकेत शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय सध्यातरी तळ््यात-मळ््यात दिसतो आहे.
महापालिकेत शिवसेनेने २४ जागा मिळवून आघाडी घेतली तर भाजपला १४ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने १८ जागा मिळवून पूर्वीचीच ताकद कायम ठेवली. स्पष्ट बहुमत नसल्याने महापालिका त्रिशंकू राहिली आहे. नेमका कोणता पक्ष कोणाशी युती करणार? याबाबत राजकीय पातळीवरही संभ्रम तयार झाला आहे. राष्ट्रवादी-भाजपा असे नवे राजकीय समीकरण जुळविण्याचा प्रयत्नही सुरू आहे. शिवसेनेला मात्र भाजपाच्या पाठिंब्याशिवाय महापौर करणे अशक्य दिसत आहे. नाशिक विभागीय कार्यालयात अद्याप कोणत्याही पक्षाने गटनोंदणी केली नाही.
...तर भाजपा अनुपस्थित राहणार
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी
यांनी गटनोंदणी करण्याची आम्हाला घाई नाही. शिवसेनेसोबत युती करण्याबाबत आमचा वरिष्ठ किंवा स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय झाला नाही, असे स्पष्ट केले आहे. भाजपा महापौर निवडीच्यावेळी मतदानाला अनुपस्थित राहून शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करण्याची तयारी करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.