दूध दरवाढीला शिवसेनेचा पाठिंबा : शशिकांत गाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:19 PM2018-07-17T12:19:58+5:302018-07-17T12:20:37+5:30
दूध दरवाढीसाठी शेतक-यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र शेतक-यांनी आपले दूध ओतून नासाडी करण्याऐवजी घरातच तूप, लोणी, दही यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवावेत, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले आहे.
केडगाव : दूध दरवाढीसाठी शेतक-यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र शेतक-यांनी आपले दूध ओतून नासाडी करण्याऐवजी घरातच तूप, लोणी, दही यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवावेत, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले आहे.
दरवाढीसाठी शेतक-यांनी सुरू केलेले आंदोलन योग्यच आहे. सरकारने दूधउत्पादनाचा खर्च व विक्रीतून हाती येणारा पैसा यांचा आर्थिक ताळमेळ बसवून शेतक-यांना पाच रुपयांची दरवाढ जाहीर करावी. शेतकरी ज्या किमतीला दूध डेअरींना दूध विकतात, त्याच्या दुप्पट किमतीने ग्राहकांना ते खरेदी करावे लागते. यात शेतक-यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतकरी ते ग्राहक यांच्यामधील दलाल यंत्रणा बंद व्हायला हवी, असे गाडे म्हणाले़