त्या युवकाच्या पीडित कुटुंबाला ‘सेवाश्रय‘चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:38+5:302021-05-05T04:35:38+5:30

गेल्या १५ वर्षांपासून अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेली आई, तिच्या सततच्या आजारपणाने मानसिक अपंगत्व आलेले वडील. ना शेती ना उदरनिर्वाहाचे काही ...

Support to the victim's family of that youth | त्या युवकाच्या पीडित कुटुंबाला ‘सेवाश्रय‘चा आधार

त्या युवकाच्या पीडित कुटुंबाला ‘सेवाश्रय‘चा आधार

गेल्या १५ वर्षांपासून अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेली आई, तिच्या सततच्या आजारपणाने मानसिक अपंगत्व आलेले वडील. ना शेती ना उदरनिर्वाहाचे काही साधन. अशा हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा आधार बनू पाहणारा विकास चव्हाण हा युवक मोलमजुरी करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभा राहून कुटुंबाला सावरण्याचे स्वप्न पाहत होता. काही दिवसापूर्वी औरंगाबाद येथे परीक्षा देण्यासाठी गेला आणि तेथे त्याची हत्या झाली. त्यामुळे त्याचे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले. शिक्षक दाम्पत्य अनुराधा व पोपटराव फुंदे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हरीचा तांडा (ता.पाथर्डी) गाठत आपल्या सेवाश्रय फाऊंडेशनच्या वतीने पाच हजार रुपयाची मदत करीत पंचायत समितीचे गटनेते सुनील ओहळ यांच्या हस्ते मदतीचा धनादेश पीडित कुटुंबाला सुपूर्द केला.

Web Title: Support to the victim's family of that youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.