४३ हजार घरांचा सर्व्हे

By Admin | Published: September 11, 2014 10:58 PM2014-09-11T22:58:00+5:302023-10-30T11:24:29+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने आजपर्यंत ४३ हजार घरांचा सर्व्हे केला असून कावीळ रुग्णांचा आकडा आता १००१ झाला आहे.

Survey of 43 thousand households | ४३ हजार घरांचा सर्व्हे

४३ हजार घरांचा सर्व्हे

अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने आजपर्यंत ४३ हजार घरांचा सर्व्हे केला असून कावीळ रुग्णांचा आकडा आता १००१ झाला आहे. गुरूवारीही नव्याने ६३ काविळीचे रुग्ण आढळून आले. एल अ‍ॅन्ड टी कंपनी संचलित फिरता दवाखानाही साथ रोग प्रतिबंधासाठी महापालिकेच्या मदतीला आला आहे. महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते त्याचे श्रमिकनगर येथे उद्घाटन झाले.
महापालिकेच्या सात नागरी आरोग्य केंद्र व दवाखान्यात साथ रोगावर मोफत आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
साथ रोग प्रतिबंधासाठी एल अ‍ॅन्ड टी कंपनीने फिरता दवाखाना सुरू केला आहे. महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रमिकनगर येथे त्याचे उद्घाटन झाले. या दवाखान्यात पहिल्या दिवशी ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
साथरोगाबाबत वैदूवाडी, नागापूर, बोल्हेगाव, मुकुंदनगर भागात मोबाईल क्लिनिकद्वारे तपासणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Survey of 43 thousand households

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.