राहुरीत ‘सारी’च्या रुग्णांचा सर्व्हे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:27 PM2020-06-18T13:27:00+5:302020-06-18T13:30:12+5:30

 राहुरी प्रतिनिधी -कोरोना महामारीचा आजार रोखण्यासाठी राहुरी शहर व तालुक्यात सारी या आजाराचा सर्वे सुरू करण्यात आला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा अधिकारी आमिषा मित्तल, तहसीलदार फसे उद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली ‘सारी’ची सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Survey of ‘Sari’ patients started in Rahuri | राहुरीत ‘सारी’च्या रुग्णांचा सर्व्हे सुरू

राहुरीत ‘सारी’च्या रुग्णांचा सर्व्हे सुरू

 राहुरी प्रतिनिधी -कोरोना महामारीचा आजार रोखण्यासाठी राहुरी शहर व तालुक्यात सारी या आजाराचा सर्वे सुरू करण्यात आला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा अधिकारी आमिषा मित्तल, तहसीलदार फसे उद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली ‘सारी’ची सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
नगरपालिका ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, तसेच शिक्षकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.
  याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात तनपुरे यांनी म्हटले आहे की, या सर्वेमध्ये तालुक्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाची थर्मल  स्कॅनर आॅक्सी प्लस मीटर या यंत्राद्वारे ताप व नाडीचे ठोके यांची तपासणी करण्यात येणार आहे. शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण मोजण्यात येते. तसेच सर्दी खोकला ताप अशी लक्षणे दिसल्यास त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येते. हा सर्वे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डोईफोडे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, मुख्य अधिकारी श्रीनिवास कुरे यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. यासाठी सहकार्य करावे,से आवाहन करण्यात आले आहे.
 
Web Title: Survey of ‘Sari’ patients started in Rahuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.