विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:17+5:302021-05-28T04:17:17+5:30

देवकौठे येथील सुभाष आरोटे यांच्या शेतातील शंभर फूट खोल विहिरीत रात्रीच्या सुमारास मादी बिबट्या विहिरीत पडला होता. गुरूवारी सकाळी ...

Survival of the fittest leopard | विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

देवकौठे येथील सुभाष आरोटे यांच्या शेतातील शंभर फूट खोल विहिरीत रात्रीच्या सुमारास मादी बिबट्या विहिरीत पडला होता. गुरूवारी सकाळी बिबट्या विहिरीत असल्याचे आरोटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल पारेकर, वनपाल डी. व्ही. जाधव, वनपाल एस. बी. ढवळे, वाय. आर. डोंगरे, वनरक्षक एस. एम. पारधी, वनकर्मचारी आर. आर. पडवळे, संतोष बोराडे, फुलसुंदर यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, नामदेव कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, अशोक मुंगसे, राजेंद्र मुंगसे, विलास मुंगसे, दादासाहेब मुंगसे, शिवाजी आरोटे, शरद आरोटे यांनी बिबट्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. मादी बिबट्यास निंबाळे येथील रोपवाटिकेत हलविण्यात आल्याचे वनपाल वाय. आर. डोंगरे यांनी सांगितले. बिबट्यास बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

फोटो : Bibtya

देवकौठे : येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास सुखरूप बाहेर काढताना वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत.

Web Title: Survival of the fittest leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.