निलंबित निरीक्षक विकास वाघ याचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:12+5:302021-08-01T04:21:12+5:30
वाघ याच्याविरोधात कोतवाली पाेलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२० रोजी नगर शहरातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला ...
वाघ याच्याविरोधात कोतवाली पाेलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२० रोजी नगर शहरातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. दाखल केलेला गुन्हा मागे घेत नसल्याने वाघ याने पीडित महिलेस पुन्हा मारहाण करत अत्याचार केला. याप्रकरणी २० फेब्रुवारी २०२१ रोजी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वाघ याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी वाघ याला १७ जून रोजी अटक केली होती. सध्या वाघ हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. बकरे यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. अर्जुन पवार यांनी काम पाहिले. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळून लावला.