निलंबित निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा अत्याचाराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:07 PM2021-02-21T17:07:42+5:302021-02-21T17:09:05+5:30
वादग्रस्त व सध्या निलंबित असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेनेच शनिवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
अहमदनगर : वादग्रस्त व सध्या निलंबित असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेनेच शनिवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
११ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे व त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता मिस्किनमळा येथील झाडीत अत्याचाराची घटना घडली. याबाबत सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विकास वाघ हा मला ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे घेऊन गेला. तेथे त्याने लाकडी दांड्याने मारहाण करत तू माझ्याविरोधात दाखल केेेलेला गुन्हा मागे घे असे म्हणत तो मला गंगा उद्यान परिसरातील मिस्किनमळा परिसरात घेऊन गेला. तेथे मी तुला पीएसआयच्या परीक्षेत मदत करतो तसेच तुझे माझ्याकडे असलेल मंगळसूत्र परत करतो असे म्हणून वाघ याने अत्याचार केला. यावेळी वाघ याने मंगळसूत्र व रोख ६० हजार रुपये हिसकावून नेल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.