साधूंच्या सेवकानेच घातपात केल्याचा संशय
By Admin | Published: July 15, 2017 05:06 AM2017-07-15T05:06:33+5:302017-07-15T05:06:33+5:30
केकताई मठातील दोघा साधूंच्या खुनामागे त्यांच्याच सेवकाचा हात असल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : केकताई मठातील दोघा साधूंच्या खुनामागे त्यांच्याच सेवकाचा हात असल्याचा संशय असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. हत्याकांड होण्याआधी अर्धा तास मठात वाद झाल्याचेही तपासातून समोर आले आहे़ केकताई मठातील सुदाम नामदेव बांगर (५५) व बाबासाहेब बाबूराव कराळे (४५) यांचा खून झाला़