सुवर्णा पाचपुते अहमदनगर सखी सम्राज्ञी

By Admin | Published: May 19, 2014 11:32 PM2014-05-19T23:32:10+5:302024-05-30T17:19:51+5:30

अहमदनगर : लोकमत सखी मंच आयोजित व वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत सखी सम्राज्ञी या स्पर्धेत श्रीगोंद्याच्या सुवर्णा पाचपुते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

Suvarna Pachpute Ahmadnagar Sakhi Samrajni | सुवर्णा पाचपुते अहमदनगर सखी सम्राज्ञी

सुवर्णा पाचपुते अहमदनगर सखी सम्राज्ञी

सुवर्णा पाचपुते अहमदनगर सखी सम्राज्ञी अहमदनगर : लोकमत सखी मंच आयोजित व वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत सखी सम्राज्ञी या स्पर्धेत श्रीगोंद्याच्या सुवर्णा पाचपुते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. अनुक्रमे द्वितीय नयना व्यवहारे, तृतीय संगीता पवार तर उत्तेजनार्थ संध्या पावसे, देवयानी खेंडके. सुवर्णा पाचपुते यांची ‘‘महाराष्टÑ सखी सम्राज्ञी’’ या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. सहकार सभागृह येथे सखी महोत्सवांतर्गत झालेल्या विविध स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन वामन हरी पेठे ज्वेलर्सचे सरव्यवस्थापक आशुतोष दाबके, ब्रँच मॅनेजर सुधीर डोळस, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे, लोकमतचे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, परीक्षक हर्षा परमानी, भावना केदार यांच्या हस्ते झाले. स्पर्धेची सुरूवात वेशभूषा आणि स्वपरिचय या फेरीने झाली. प्रत्येक स्पर्धकाने विविध वेशभूषेत आणि त्याला अनुसरून कलाविष्कार सादर करत आपला परिचय दिला. तर अ‍ॅडमॅड शोने दुसर्‍या फेरीत रंगत आणली. स्पर्धकांनी विनोदी जाहिरात सादर करून उपस्थित सखी प्रेक्षकांना पोट धरून हसवले. प्रश्नोत्तर फेरीत सखी स्पर्धकांनी परीक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सखी सम्राज्ञीच्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी १५ सखींची निवड करण्यात आली होती. तसेच सखी महोत्सवांतर्गत रांगोळी, फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स, समूहगीत गायन, मेहंदी, ब्रायडल, रेसीपी आदी स्पर्धा पार पडल्या. एकापेक्षा एक सरस, देखण्या रांगोळ्या काढण्याबरोबर स्त्रीभ्रुणहत्या, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा असे सामाजिक प्रबोधन करणारे विविध संदेश देखील रांगोळ्याद्वारे देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन देखील घडविले. सखी महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांचे निशिगंधा डावरे, प्रिया ओगले, गौरी देशमुख, रूपाली देशमुख, स्मिता फडके, वर्षा शेकटकर, दीपाली बिहाणी, सुरेखा मणियार, बबीता गांधी, शुभा बोगावत, आशा देशपांडे आदींनी परीक्षण केले. सर्व विजेत्यांना भेटवस्तू, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमस्थळी उपस्थित सखी प्रेक्षकांमध्ये सरोज अजित चोरडिया, राधिका शेलार, कुमुद अच्युत देशपांडे, सुलोचना राजेंद्र कराळे, अर्चना विनोद मांजरे, भारती मदन गडदे, श्वेता कुलकर्णी, स्नेहल गांधी, रेखा खामकर, पूजा सचिन चंगेडीया या सखींना वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचे वतीने लकी ड्रॉद्वारे बक्षिसे देण्यात आली. १०४ वर्षांची परंपरा असलेले सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स या दालनात कलर्स कलेक्शन, अ‍ॅन्टीक नेकलेस, कलकत्ता पॅटर्न असे नाविन्यपूर्ण दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच येथे रियल डायमंडचेही आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)

स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे -

स्पर्धा फॅन्सी ड्रेस सोलो डान्स रेसिपी स्पर्धा समूहगीत गायन मेहंदी स्पर्धा ब्रायडल मेकअप रांगोळी स्पर्धा

प्रथम सुवर्णा कोठारी करीश्मा कोठारी दीपाली पोखरणा शुभदा चिखले कृतिका भंडारी सारिका भगत रूपाली गायकवाड

द्वितीय संगीता पुंड सारिका गाडे वर्षा शेकटकर सुजाता रामदासी पूजा चंगेडिया सुजाता देवळालीकर ज्योती कोतकर

तृतीय राणी कासलीवाल अनुप्रिती झंवर रेखा मैड रत्नप्रभा क्षीरसागर हेमलता परदेशी अनुजा कांबळे तेजस्विनी जोशी 

Web Title: Suvarna Pachpute Ahmadnagar Sakhi Samrajni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.