सुवर्णमहोत्सवी अमरतिथी सोहळा : काही क्षणात मेहेरबाबांच्या समाधीस्थळी पसरली निरव शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 04:57 PM2019-01-31T16:57:36+5:302019-01-31T16:58:20+5:30
देश - विदेशातील लाखो मेहेरप्रेमींची मेहेर टेकडीवर गर्दी उसळली होती.
केडगाव : देश - विदेशातील लाखो मेहेरप्रेमींची मेहेर टेकडीवर गर्दी उसळली होती. पावणे बाराच्या सुमारास मेहेरधून गाण्यात आली आणि बरोबर १२ च्या ठोक्याला सारी मेहेरटेकडी मौनाने शांत झाली. सुमारे १५ मिनीटे मेहेरबाबांच्या समाधीस्थळी निरव शांतता पसरली. वा-याची झुळुकही काही क्षण शांत झाली. लाखों भाविकांच्या गर्दितही मेहेर टेकडी भक्तीभावाने निशद्ब झाली.
अरणगाव ( ता. नगर ) येथील अवतार मेहेरबाबाच्या समाधी स्थळी सुवर्ण महोत्सवी ( ५० वी )अमरतिथी सोहळा सुरू आहे. आजच्याच दिवशी ३१ जानेवारी १९६९ रोजी बांबानी देहत्याग केला होता. या निमित्ताने मेहराबाद (अरणगाव)येथे सुमारे ५५ हजार भाविकांनी आज मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळून आपली आध्यात्मिक भावना व्यक्त केली.
बुधवारपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी सुमारे ४० हजार भाविक बसतील असा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्तही जेथे जागा मिळेल तेथे भाविक बसून होते. सकाळी साडेअकरा वाजता श्रीधर केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज सकाळी ७ वाजता मुख्य मंडपात प्रेममिलन कार्यक्रम सुरु झाला. तो उशिरापर्यत चालू होता. आजही समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या. जगातील ७० देशातून व भारतातून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत. देश-विदेशातील मेहेरप्रेमीनी भजने, गजल, नृत्ये, कव्वाली, गाणे, नाटिका सादर केले.
स्वच्छतेचा आणि एकात्मतेचा संदेश जगभर
मेहेरबाबा यांच्या समाधी स्थळी जवळपास ७४ देशातील भाविकांसह देशभरातुन सुमारे दीड लाख भाविक अमर तिथी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. इतक्या संख्येने भाविक व त्यांची वर्दळ असुनही साधा कागदाचा तुकडा व कुठला कचरा ही कुठे दिसत नाही. बाबांचे भक्त टेकडीवरील सर्व स्वच्छता करून आंतरराष्ट्रीय एकात्मतेचे संदेश यामुळे जगभर गेला आहे .