संगीत आणि नृत्य परीक्षेत ‘ध्रुव’चे सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:16+5:302021-04-22T04:20:16+5:30
संगीताच्या प्रारंभिक परीक्षेत गायन प्रकारात मधुरा परेश कोळपकर हिने विशेष प्राविण्य, तर आस्था नीतेश जोशी, मधुरा नीलेश डेरे, ऋषभ ...
संगीताच्या प्रारंभिक परीक्षेत गायन प्रकारात मधुरा परेश कोळपकर हिने विशेष प्राविण्य, तर आस्था नीतेश जोशी, मधुरा नीलेश डेरे, ऋषभ योगेश म्हसे, साची रमाकांत राठी यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. हार्मोनियम वादनात रोहन विकास भारती व गार्गी संजय विखे यांनी प्रथम श्रेणी मिळवली. तबला वादनात निनाद प्रणव बरदापूरकर, समृद्धी संतोष मंडलिक हे प्रथम, ओम विनोद गणोरे, श्रेयस नितीन महाले, जयदीप जयप्रकाश चोपडे यांनी द्वितीय, तर सारंग सोपान भालके याने विशेष प्राविण्य संपादन केले.
प्रवेशिका प्रथम परीक्षेत गायन प्रकारात इरा योगेश फटांगरे, दुर्वा अभिजित बिडवई, पलक ओंकार वर्मा, श्लोक समीर काळे, नीलय आनंद गांधी, देवकी अतुल लोहे व प्रीती बाळासाहेब बिबवे यांनी प्रथम, तर वेदिका दीपक पटेल हिने विशेष प्राविण्य संपादन केले. हार्मोनियम प्रकारात अर्जुन नीलेश वाकचौरे याने विशेष प्राविण्य, तर युगाली योगेश फिरोदिया हिने प्रथम श्रेणी मिळवली. तबला वादनात साईश सुजित खिलारी, रुद्राक्ष सुभाष मंडलिक, अंश नीलेश साकी, आर्यन नेताजी भाबड यांनी द्वितीय श्रेणी संपादन केली. प्रवेशिका पूर्ण परीक्षेत गायन प्रकारात आर्यन विनय मुळे, वेदिका विवेक रोहोकले, प्रतीक्षा राजेश मालपाणी, नित्या हार्दिक सराफ यांनी द्वितीय श्रेणी मिळवली, तर हार्मोनियम प्रकारात गौरी राजेश पाडेकर, जान्हवी नीलेश डेरे यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. याशिवाय तबला प्रकारात श्रेयान अनिकेत कासार, तन्मय सुरेश घोलप यांनी प्रथम, तर निषाद संजय विखे याने द्वितीय श्रेणी प्राप्त केली. नृत्याच्या प्रारंभिक परीक्षेत अर्णवी ऋषिकेश शहाणे, मधुरा राजू कानवडे, मनस्वी मारुती भांडकोळी यांनी विशेष प्राविण्य, तर मनाली मारुती दिवटे हिने प्रथम व आराध्या जनार्दन पुजारी हिने द्वितीय श्रेणी प्राप्त केली.
प्रवेशिका प्रथम परीक्षेत स्वरा सतीश वलवे, यशोधरा लक्ष्मीकांत नाईकवाडी, अदिती सुनील डेरे, राशी गिरीश टोकसे, साची रमाकांत राठी, अनन्या पंकज वाकचौरे यांनी प्रथम श्रेणी संपादन केली. प्रवेशिका पूर्ण परीक्षेत तनुजा काशिराम पागडे, श्रद्धा प्रशांत रहाणे, अक्षरा जगन्नाथ तापडे, रीत चेतन राजपाल, सौम्या सचिन जोशी, अक्षरा ओंकार वर्मा, श्रेया राजेंद्र आडभाई, तन्वी प्रदीप कलंत्री यांनी प्रथम श्रेणी मिळवली. मध्यमा प्रथम परीक्षेत श्रिया अमोल मुळे, पृथा ऋषिकेश मोंढे, अदिती राजेश लाहोटी, जिया अमित बाफना यांनी विशेष श्रेणी, तर रिद्धी रमाकांत राठी हिने प्रथम श्रेणी मिळवली. मध्यमा पूर्ण परीक्षेत भूमी आबासाहेब शिंदे हिने विशेष प्राविण्य संपादन केले.
या विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक सोपान भालके, प्रवीण उबाळे, प्रशांत तिवारी, नृत्य प्रशिक्षक सोनाली महोपात्रा, गंधर्व पलाई आणि विश्वजीत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी कौतुक केले.