रक्तदान शिबिरे घेऊन मोफत रक्त देणारे स्वयंभू प्रतिष्ठान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:54+5:302021-05-06T04:22:54+5:30
श्रीगोंदा : येथील स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी गेल्या चार वर्षांत १३ रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. यातून १ ...
श्रीगोंदा : येथील
स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी गेल्या चार वर्षांत १३ रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. यातून १ हजार ८०० रक्तपिशव्यांचे संकलन केले आहे. ८५० रक्तपिशव्या गरजू रुग्णांना मोफत देण्यात आल्या आहेत.
स्वयंभू युवा प्रतिष्ठानने कोरोनाच्या कठीण काळातही गरज असताना, शहरातील होनराव विद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून १०३ रक्त पिशव्यांचे संकलन केले. या शिबिराचा प्रारंभ नगराध्यक्षा शुभांगी पोटे, तहसीलदार प्रदीप पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संघर्ष राजुळे, शारदा विद्या संकुलचे अध्यक्ष दीपक होनराव, नगरसेवक महावीर पटवा यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर नगरे, कार्यध्यक्ष सौरभ राऊत, मीडिया प्रमुख पवन क्षीरसागर, जयराज गोरे, धीरज राऊत, अक्षय दांडेकर, रोहन क्षीरसागर, अबरार शेख यांनी गेल्या चार वर्षांपासून रक्तदान शिबिराचा उपक्रम हाती घेतला आहे. ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याची संधी निर्माण करून दिली, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर नगरे यांनी सांगितले.
मी समाजाचे देणे लागते, या भावनेतून वर्षातून किमान दोन वेळा रक्तदान करते. यापुढेही रक्तदान करून दुसऱ्यांचा जीव करण्यासाठी रक्तरूपी दान सतत करत राहणार आहे, असे अरिहंत महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा गांधी यांनी सांगितले.
---
०५ श्रीगोंदा रक्तदान
श्रीगोंदा येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना नगराध्यक्षा शुभांगी पोटे, स्वयंभू प्रतिष्ठानचे सदस्य.